Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

15 व्या वित्त आयोगातून घंटा गाडी खरेदी; शेडगेवाडी ग्रामपंचायतीचे कौतुकास्पद पाऊल

शेडगेवाडी : घंटागाडीचे लोकार्पण करताना दिनकर शेडगे, रविंद्र शेडगे, बाजीराव शेडगे, ग्रामसेवक मनोहर पाटील व मान्यवर. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव) स

कोल्हापूर बसस्थानकात शिवशाही बसचा ब्रेक निकामी
उपोषण करताच पाच तक्रारींचा झाला निपटारा; ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ; ग्रामसेवकाचे निलंबन
कराड शहरातील थकबाकीदार आता झळकणार फ्लेक्सवर

स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने उत्तम पर्याय : बाजीराव शेडगे
शिराळा / प्रतिनिधी : वाढत्या रोगराईच्या काळात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर स्वच्छता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन उद्योजक बाजीराव शेडगे यांनी केले ते घंटागाडी लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
15 व्या वित्त आयोगातून शेडगेवाडी, ता. शिराळा या ग्रामपंचायतीने घंटागाडी खरेदी करून तिचे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व नागरिक यांच्या शुभ हस्ते विधीवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
स्वच्छते विषयी अधिक माहिती देताना बाजीराव शेडगे म्हणाले, गावातील व बाजार पेठेतील इतरत्र अस्ताव्यस्त पडणारा ओला व सुका कचरा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व गावाच्या दृष्टीने प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेऊन गाव व बाजारपेठ स्वच्छ ठेवण्यासाठी पर्याय म्हणून कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीची आवश्यकता असल्याने घंटागाडी खरेदी करून याचे आज ग्रामपंचायतीने लोकार्पण केले आहे.
शेडगेवाडी हे मोठी बाजारपेठ व मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. गावातील तसेच बाजारपेठेतील ओला कचरा उचलण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या घंटागाडीचा वापर करण्यात येईल. तरी नागरिक व व्यापारी निश्‍चितच या उपक्रमास सहकार्य करतील, असे शेडगे यांनी प्रतिपादन केले.
यावेळी सरपंच जिजाबाई सुतार, दिनकर शेडगे, बाजीराव शेडगे, रवींद्र शेडगे, गणेश शेडगे, संभाजी शेडगे, सुनील देसाई, महादेव शेडगे, रोहीणी देसाई, भारती शेडगे, विठ्ठल शेडगे, तानाजी नाटुलकर, ग्रामसेवक मनोहर पाटील, ग्रामपंचायत क्लार्क सुरेश शेडगे, विजय शेडगे, अक्षय पाटील उपस्थित होते.

COMMENTS