बीड : शिक्षक दरबारातून ‘शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे प्रश्न सोडविणे हे मी माझे कर्तव्य समजतो. शिक्षक हाच माझा धर्म आणि शिक्षक हीच माझी जात

बीड : शिक्षक दरबारातून ‘शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे प्रश्न सोडविणे हे मी माझे कर्तव्य समजतो. शिक्षक हाच माझा धर्म आणि शिक्षक हीच माझी जात असे प्रतिपादन शिक्षक आ. विक्रम काळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. लोकनेते स्व. अजित दादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मराठवाड्याचे लोकप्रिय व लढवय्ये शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ५ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय व सेवाविषयक, अध्यापनाचे काम सोडून निवडणुकीचे कामे व सर्व शिक्षकावर शासनाने शक्तीची केलेली टी.ए.टी. परीक्षा अशा अनेक अडचणी जाणून घेण्यासाठी स्काऊट गाईड भवन बीड येथे शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी त्यामधून काही प्रश्न तत्काळ सोडवण्यात आले आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या समस्या ऐकून घेतल्या व राहिलेले प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्यातील द.बा. घुंमरे विद्यालय बीड, श्री शिवाजी महाराज विद्यालय बीड, यशवंत विद्यालय बीड, आदर्श विद्यालय बीड, इंदिरा गांधी विद्यालय बीड, छत्रपती शाहू विद्यालय बीड या सहा शाळेमध्ये बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये पाठ्यपुस्तकातील लेखक अय्युब पठाण, लोहगावकर सर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या लेखन प्रवासाचे अनुभव सांगितले. आणि लेखक व कवींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
या उपक्रमामुळे शिक्षकांना आपल्या अडचणी थेट आमदार विक्रम काळे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रिया राणी पाटील, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीमती चव्हाण, वेतन अधिक्षक (मा.) राजेश खटावकर, वेतन अधिक्षक (प्रा.) राजेंद्र ढाकणे, कार्यालयीन अधिक्षक (मा.) अजय बहिर, उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, वरिष्ठ लिपिक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मांडून प्रश्न सोडवणे शक्य झाले. त्यामुळे शिक्षकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा, तर शिक्षकांना न्याय व मार्गदर्शन मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमासाठी उपस्थित मान्यवर, कवी, लेखक अय्युब पठाण, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप विके, प्राथमिक जिल्हाध्यक्ष संभाजीनगर खुंटे, संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष दीपक घुमरे, गणेश वाघ, विपुल काळे, शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण, सृजनशील विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ नामदेव मात्रे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी शिक्षक संघ, बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र खोड, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, नवनाथ मात्रे, पाखरे, मुळे, तसेच सर्व पदाधिकारी व शिक्षक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले आणि दोन उपक्रम आनंदात यशस्वीरीत्या पार पाडले.

COMMENTS