Homeताज्या बातम्या

कुंडलवाडीत घरफोडी; सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

कुंडलवाडी - शहरातील बकरखाटीक गल्ली येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटातील सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याच

निकषबाह्य इंग्रजी माध्यम शाळांवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा – डॉ. रॅपनवाड
कात्रजमध्ये १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या; ४ आरोपींना अटक करून भरपावसात काढली धिंड
अतिक अहमदच्या मुलाचा अपघातात मृत्यू
परभणीच्या कुंभार पिंपळगाव येथील ज्वेलर्समध्येच चोरी; तब्बल 20 लाखांचे सोन्याचे  दागिने लंपास | Navarashtra

कुंडलवाडी – शहरातील बकरखाटीक गल्ली येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटातील सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. हेडगेवार चौक ते नवीन बसस्थानक मार्गालगत असलेल्या बकरखाटीक गल्लीमध्ये माजी नगरसेवक सुदर्शन मांजरे यांचे घर आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती ललिता सुदर्शन मांजरे या या घरात वास्तव्यास आहेत. त्या 7 ऑगस्ट रोजी विजयवाड येथे गेल्या होत्या. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्या कुंडलवाडी येथील आपल्या घरी परतल्या असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटात ठेवलेले सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती तातडीने कुंडलवाडी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोकॉ. आनंद बोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली. यावेळी नगरसेवक साईनाथ भातनाते, नरेश करपे तसेच परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या घरफोडीप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS