Homeताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात मांडूळ साप; सर्पमित्राने दिले जीवदान

नांदेड - विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात बुधवारी मांडूळ जातीचा साप आढळून आल्याने काही काळ

घुले प्रकरण: घटनेदिवशी मी अन् गाडीही घरीच! सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळले, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी
नान्नज बंदला गावकऱ्यांचा प्रतिसाद
महावितरण अधिकार्‍यावर खंडणी मागितल्याचा आरोप; कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा इशारा

नांदेड – विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात बुधवारी मांडूळ जातीचा साप आढळून आल्याने काही काळ रुग्ण, नातेवाईक व कर्मचार्‍यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचारी तथा सर्पमित्र कुणाल महागडे यांनी सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

या वेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शीतल राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मांडूळ हा रेड सँड बोआ (Eryx johnii) या नावाने ओळखला जाणारा बिनविषारी साप आहे. त्याची बोथट शेपटी डोक्यासारखी दिसत असल्याने त्याला काही ठिकाणी ‘दोन तोंडाचा साप’ असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात त्याला दोन तोंडे नसतात.

मांडूळाबाबत समाजात अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. त्यापासून औषधे किंवा मौल्यवान वस्तू तयार होतात, अशा अफवांना वैज्ञानिक आधार नाही. या गैरसमजांमुळे मांडूळाची अवैध खरेदी-विक्री व तस्करी होण्याची शक्यता असते. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अशा वन्यजीवांच्या अवैध पकड, बाळगणे आणि व्यापारावर निर्बंध आहेत. त्यामुळे नागरिकांनी मांडूळ किंवा कोणताही साप आढळल्यास त्याला मारू नये अथवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा. रुग्णालयाच्या गर्दीच्या परिसरात सापाला सुरक्षितपणे पकडून त्याला जीवदान दिल्याबद्दल सर्पमित्र कुणाल महागडे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

COMMENTS