माजलगाव : वंचित, पीडित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल 38 वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे बहुजन नेते तथा बहुजन विकास मोर्चाचे सं

माजलगाव : वंचित, पीडित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल 38 वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे बहुजन नेते तथा बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘संघर्ष योद्धा’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगावच्या कार्यालयात दि 07 ऑगस्ट शुक्रवार रोजी त्यांचा उपसभापती श्रीहरी नाना मोरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
वंचित, पीडित आणि शोषित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबुराव पोटभरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून प्रभावीपणे आवाज उठविला आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेत अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना ‘संघर्ष योद्धा’ पुरस्कार जाहिर करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी (नाना) मोरे, कचरू (तात्या) खळगे, नवनाथ (अण्णा) धाईजे, प्रदीप पट्टेकर, लेखापाल उद्धव फपाळ, सांख्यिकी अधिकारी मोतीराम चव्हाण, निरीक्षक सुनील सवणे, कोषपाल मीनानाथ मुळे, वरिष्ठ लिपिक अमोल आगे, प्रतवारीकार अतुल होके, नाईक शेख रहीम व सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

COMMENTS