श्रीगोंदा : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त टाकळी कडे ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार

श्रीगोंदा : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त टाकळी कडे ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र या कार्यक्रमाकडे गावच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा, शिक्षण प्रसारातील योगदानाचा तसेच शोषित-वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातही असलेले महत्त्व अधोरेखित केले.परंतु, गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यापैकी कोणीही या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले. “महापुरुषांच्या जयंतीप्रती लोकप्रतिनिधींनी किमान आदर दाखवणे अपेक्षित होते,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या या गैरहजेरीचा जाहीर निषेध नोंदवला. भविष्यात अशा प्रकारची दुर्लक्षाची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच ग्रामपंचायतीने अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS