Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे संघटन सृजन अभियान हे एक ऐतिहासिक जनआंदोलन ठरत आहे- शेख अमर

बीड :पहिल्यांदाच नेते ते कार्यकर्ते अशा प्रत्येक स्तरावर पक्षांतर्गत लोकशाही अनुभवायला मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आनंदी आणि अभिमानी आहे की जिल

आ.संजय गायकवाडांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही; शिवसेनेने हात झटकले, विधानाचा केला निषेध
वंगभूमीत फुलले कमळ; ममतांचा गड उद्ध्वस्त! प. बंगाल, आसाममध्ये भाजपची सत्ता तर केरळमध्ये काँगे्रसने मारली मुसंडी; तामिळनाडूमध्ये टीव्हीके; पदुच्चेरीमध्ये एनडीएची सत्ता
बारामतीत उमेदवार देण्याचा काँगे्रसचा निर्धार; सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार निश्‍चिती अंतिम टप्प्यात : हर्षवर्धन सपकाळ

बीड :
पहिल्यांदाच नेते ते कार्यकर्ते अशा प्रत्येक स्तरावर पक्षांतर्गत लोकशाही अनुभवायला मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आनंदी आणि अभिमानी आहे की जिल्हाध्यक्षांच्या निवडीत त्यांच्या मताला योग्य मान मिळत आहे दिनांक 10 एप्रिल रोज़ी बीड येथे बीड काँग्रेसचे संघटन सृजन अभियान संपन्न झल्याचे मा नगरसेवक अमर शेख यांनी प्रसिद्धी पत्रकात बोलताना हे म्हणाले.
बीड जिल्हा काँग्रेसचे संघटन सृजन अभियान महँजे कार्यकर्ता दावेदारदेखील उत्साहाने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत, कारण या लोकशाही प्रक्रियेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची आणि आपले विचार मांडण्याची समान संधी त्यांना मिळाली आहे जनतेलाही या बदलाचा आनंद आहे. एआयसीसी निरीक्षक राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे केन्द्रीय समिती निरीक्षक म्हणून नितुजी वर्मा (राष्ट्रिय महासचिव कांग्रेस).मा आमदार एम.एम शेख साहेब. विद्या पाटील (बीड जिल्हा निरीक्षक). राहुलजी सोनवणे (बीड जिल्हा अध्यक्ष). सर्व समिती थेट गावोगावी, कार्यकर्त्यांच्या दारी पोहोचून संवाद साधत आहेत. या थेट संवादामुळे काँग्रेस आणि जनतेतील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले असून कार्यकर्ते व नागरिकांमध्ये नवी ऊर्जा, जोश आणि आत्मविश्वास संचारला आहे. बीड जिल्हा काँग्रेस कमिटी ची जबाबदारी हा माझ्या राजकीय प्रवासातील अभिमानास्पद आणि संस्मरणीय टप्पा आहे. हा अनुभव केवळ संघटनेच्या ताकदीचा पुरावा नसून, काँग्रेसला अधिक सक्षम, सजग आणि संघटित करण्यासाठी प्रत्येक स्तरावर खांद्याला खांदा लावून झटण्याचा माझा संकल्प आणखी दृढ करणारा आहे.असल्याचे मा नगरसेवक अमर शेख यांनी बीड काँग्रेसचे संघटन सृजन अभियान प्रसंगी सांगितले.

COMMENTS