Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्डा येथील मोहरी तलावाची समितीकडून पाहणीभराव खचल्याने मोठे भगदाड; जलसाठ्यावर परिणाम;लवकरच दुरुस्ती

जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मोहरी तलाव फुटल्याच्या घटनेनंतर धरण सुरक्षा आढावा समितीने प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या तलावावर खर्डासह परिसरातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी अवलंबून असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यालगतचा भराव खचल्याने मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले असून स्थानिक जलसाठा व शेतीवर त्याचा परिणाम झाला आहे.या घटनेची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून दुरुस्तीच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर धरण सुरक्षा आढावा समितीने घटनास्थळी भेट देत नुकसानीचे बारकाईने परीक्षण केले.यावेळी मुख्य अभियंता संजय चोपडे, कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे तसेच निवृत्त अधीक्षक अभियंता शिवाजी बोलभट उपस्थित होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी समितीसमोर निवेदन सादर करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली.समितीने परिस्थितीची गांभीर्याने नोंद घेतली असून, लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, तसेच जलसाठा सुरक्षित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

ऐतिहासिक रस्ता, चौक, वास्तूस भूषण देशमुखांचे नाव द्यावे : गुगळे  
कुख्यात गुंड सचिन घायवळ राजस्थानातून अटकेतवेषांतर करूनही पोलिसांच्या जाळ्यात ; नऊ महिन्यांपासून फरार
कुकडी-सीना कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडाआ. रोहित पवारांचा पाठपुरावा ;  प्रशासनाकडे मागणी

COMMENTS