Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगन्नाथ म्हसे यांचे निधन

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील जगन्नाथ भाऊसाहेब म्हसे (वय ६८) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. म्हसे हे स्वभावाने शांत, मनमिळाऊ व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, तीन मुली, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते मारुती व बाबासाहेब म्हसे यांचे बंधू, रवींद्र म्हसे यांचे वडील, तसेच दिगंबर व क्रांतीसेनेचे मधुकर म्हसे यांचे चुलते होत. त्यांच्या पार्थिवावर कोंढवड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाळवंडी बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून ‘महात्मा फुले चौक’ची स्थापना
महालक्ष्मी माता यात्रोत्सवाची कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता
नैसर्गिक शेतीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त : कुलगुरू डॉ. विलास खर्ची

COMMENTS