शेवगाव : शिक्षणामुळे ज्ञान प्राप्त होते; मात्र त्या ज्ञानाला नम्रता, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्यासच व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने घडते, असे प्रतिपादन प्रा. किसनराव (के. आर.) माने यांनी केले.निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. बी. एल. खटीक यांनी केले, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे होते.प्रा. माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “ज्याचे हात आकाशाला स्पर्श करतात तो यशस्वी होतो; परंतु ज्याचे पाय जमिनीवर घट्ट असतात तोच खऱ्या अर्थाने महान होतो,” असे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत नम्रता, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्व जपावे, असे आवाहन केले. तसेच कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारून समाजाभिमुख कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे यांनी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा घेतला. शिक्षणाबरोबरच चारित्र्य, शिस्त आणि सामाजिक जाणीव या मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एम. निजवे यांनी केले, तर आभार प्रा. एन. एन. झिंजे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS