Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्कर्मातील समर्पणशीलताच चिरंजीव ठरते : प्रा. विलासराव तुळे

श्रीरामपूर : 12 व्या शतकापासून संत आणि त्यांचे वाङ्मय मर्मस्पर्शी आहे, त्यामध्ये श्रीसंत गोरा कुंभारासारखी अद्वैत भक्ती आदर्श होय, कोणत्याही सत्क

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
संगमनेरमध्ये जोडे मारो आंदोलन; बागेश्वर व संजय गायकवाड यांचा निषेध
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसायमाजी मंत्री थोरात ; ‘ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात

श्रीरामपूर : 12 व्या शतकापासून संत आणि त्यांचे वाङ्मय मर्मस्पर्शी आहे, त्यामध्ये श्रीसंत गोरा कुंभारासारखी अद्वैत भक्ती आदर्श होय, कोणत्याही सत्कर्मातील समर्पणशीलताच चिरंजीव ठरते असे मत प्रा. विलासराव तुळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते संत जीवनदर्शन व भक्तीमाहात्म विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी हभप पुरुषोतम महाराज कोळपकर होते. संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी हभप अशोकराव शिंदे, हभप भागवतराव मुठे पाटील, प्रा. शिवाजीराव बारगळ,डॉ. शिवाजी काळे, डॉ. रामकृष्ण जगताप, किशोर गाढे,ज्ञानेश्‍वर दुधाळे, दत्तात्रय औताडे, संजय त्रिभुवन, सुखदेव सुकळे, किसनदेव भागवत, नीतीन जोर्वेकर, चेतन तुळे आदी उपस्थित होते. पुढील मान्यवरांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले,त्यात प्रा. दिलीप सोनवणे, दत्तात्रय रसाळ गुरुजी, शंकरराव जोर्वेकर,ङ् बाळासाहेब तनपुरे, ङ् हरिश्‍चंद्र नाईक, बाळासाहेब देशमुख, संतोष लेंभे, पोपटराव पटारे, कवयित्री विठाबाई वने/ शेटे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रा. तुळे यांनी संत गोरा कुंभार यांच्या अभंग व जीवन चरित्राचा आढावा घेऊन पुरस्कार्थींचे कौतुक केले.श्रीराम अबॅकस क्लासच्या संचालिका प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे यांनी समारोप केला.

COMMENTS