Homeताज्या बातम्या

दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; नीट पेपर फुटीप्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसी बळाच्या वापराच्या निषेधार्थ राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आह

मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत; बीडमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
धांडेवाडीत वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचा उपक्रम
पवार कुटुंबियांच्या आनंदात मुंडे परिवार सहभागी! बाळदादा पवार यांच्या चिरंजीवाच्या विवाहास ना. पंकजाताई मुंडे, डॉ. प्रीतमताई मुंडे यांची उपस्थिती
NEET Paper Leak: नीट पेपरफुटीची धग विदर्भात; १०० हून अधिक ठिकाणी तरुण  रस्त्यावर

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसी बळाच्या वापराच्या निषेधार्थ राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या ३४ दिवसांपासून नीट पेपर फुटीप्रकरणी (NEET Exam Paper Leak) विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून सरकारसोबत अद्याप कोणतीही यशस्वी चर्चा झालेली नाही.

याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि सुरक्षेवर भाष्य केले आहे. देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, “पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्यात येईल. यासंबंधी संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.”

पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “Nothing is more important than the welfare and future of our youth!” (युवकांचे कल्याण आणि भविष्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही!). पंतप्रधानांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत “Hi my name is Nothing” अशी खोचक टिप्पणी करत थेट निशाणा साधला आहे.

दुसरीकडे, पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेनंतर आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

COMMENTS