Homeताज्या बातम्या

पवार कुटुंबियांच्या आनंदात मुंडे परिवार सहभागी! बाळदादा पवार यांच्या चिरंजीवाच्या विवाहास ना. पंकजाताई मुंडे, डॉ. प्रीतमताई मुंडे यांची उपस्थिती

बीड: गेवराई येथील भाजपा नेते श्री. बाळदादा पवार व नगराध्यक्षा सौ. गीताभाभी पवार यांचे सुपुत्र चि. शिवराज आणि रामपुरी (जि. परभणी) येथील श्री. सुरे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कुटुंबावर जमिनीच्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप; भाजप आक्रमक
के. एस. पी. विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक
कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचा मातृभूमी प्रतिष्ठानकडून गौरव

बीड: गेवराई येथील भाजपा नेते श्री. बाळदादा पवार व नगराध्यक्षा सौ. गीताभाभी पवार यांचे सुपुत्र चि. शिवराज आणि रामपुरी (जि. परभणी) येथील श्री. सुरेशराव पंडितराव यादव यांची सुकन्या चि. सौ. का. डॉ. जुही यांचा शुभविवाह पुणे येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यामुळे पवार आणि मुंडे परिवारातील स्नेहबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

नवदाम्पत्याला दिल्या शुभेच्छा

या शाही विवाह सोहळ्यास राष्ट्रीय सचिव ना. पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी खास उपस्थिती लावली. त्यांनी नवदाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्या सुखी, समृद्ध आणि दीर्घ वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. याप्रसंगी मुंडे भगिनींनी वधू-वर कुटुंबीय, नातेवाईक तसेच विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला.

या भव्य लग्नसोहळ्याला माजी आमदार श्री. लक्ष्मणराव पवार यांच्यासह पवार व यादव कुटुंबीय, गेवराई परिसरातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

COMMENTS