Homeताज्या बातम्या

राहुल गांधींचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर रात्रभर ठिय्या आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत वातावरण कमालीचे तापले असून जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त; वारा-पाऊस नसतानाही हणेगाव मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
पंजाबच्या शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; शंभू-खनौरी सीमा केली बंद
आंदोलन हाताळण्यात भाजप अपयशी!
सरकार ने दिया पेपर लीक पर चर्चा का प्रस्ताव, कांग्रेस ने ठुकराया, धर्मेंद्र  प्रधान के इस्तीफे पर अड़े राहुल गांधी | Rahul Gandhi Stages Protest Outside  PM House ...

दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत वातावरण कमालीचे तापले असून जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांनी मोठा पाठिंबा दिला असून आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत थेट मैदानात उडी घेतली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ७, लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर थेट धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि पक्षाचे अनेक खासदार व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.

केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चेला नकार

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि गृहसचिव गोविंद मोहन हे राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी आले होते. मात्र, राहुल गांधींनी त्यांच्याशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला, त्यामुळे दोघांनाही तिथून परत फिरावे लागले. राहुल गांधी आपल्या मागण्यांवर ठाम असून ते आज रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून दिल्लीचे राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे.

COMMENTS