Homeताज्या बातम्या

धांडेवाडीत वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचा उपक्रम

कर्जत: विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या वारकरी माऊलींच्या आरोग्याची काळजी घेत रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने धांडेवाडी येथे मोफत आरोग्य तपा

बीड शहर परिसरात चालकावर प्राणघातक हल्ला करून लूट; ग्रामस्थांनी एका चोरट्याला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
शेतकरी कर्जमुक्तीसह कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर द्यावा: आ. विवेक कोल्हे; अभ्यासपूर्ण मांडणीने गाजवले अधिवेशन
मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत; बीडमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

कर्जत: विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या वारकरी माऊलींच्या आरोग्याची काळजी घेत रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने धांडेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करून सेवाभावाचा आदर्श घालून दिला. वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

श्री क्षेत्र बुरूडगाव (जि. अहिल्यानगर) ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी माऊलींचा धांडेवाडी येथे मुक्काम असताना सचिन रायचंद धांडे यांच्या निवासस्थानी हे शिबीर आयोजित करण्यात आले. पायी प्रवासामुळे होणारा शारीरिक थकवा, पायांचे त्रास, रक्तदाब तसेच इतर आरोग्यविषयक तक्रारींची तपासणी करून वारकऱ्यांना आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

या शिबिरात कर्जतमधील सुप्रसिद्ध व अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राम तोरडमल यांनी वारकरी माऊलींची आरोग्य तपासणी केली. वारकऱ्यांना वेळेवर उपचार व औषधांची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली. या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत रोटरी क्लबचे आभार मानले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राम तोरडमल तसेच श्री. सचिन रायचंद धांडे यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष रो. अनिल तोरडमल, सचिव रो. संतोष सुरवसे, क्लब ॲडमिन रो. प्रा. विशाल मेहेत्रे, रो. नितिनमामा देशमुख, रो. राजेंद्र जगताप, रो. घनश्याम नाळे, रो. संदीप गदादे तसेच सिद्धीविनायक कृषी बचतगटाचे अजिनाथ धांडे, गणेश धांडे, सुनील धांडे, देविदास बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS