भारतीय क्रिकेटची ब्राह्मणी परिक्रमा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारतीय क्रिकेटची ब्राह्मणी परिक्रमा!

क्रिकेट हा आमच्या लेखनाचा विषय आम्ही कधी ठेवलाच नाही! या खेळातील उच्चवर्णीयांचे ब्राह्मणी हितसंबंधांचे राजकारण सुरूवातीपासूनच राहिले आहे. आख्खी भारती

कोरोनामुळे प्रवाशी वाहनांच्या निर्यातीत घट
मतांच्या ध्रुवीकरणासाठी राजकीय संदोपसुंदी
बेशिस्त वाहन चालकांवर हदगाव पोलीस प्रशासनाचा कारवाईचा दंडूका

क्रिकेट हा आमच्या लेखनाचा विषय आम्ही कधी ठेवलाच नाही! या खेळातील उच्चवर्णीयांचे ब्राह्मणी हितसंबंधांचे राजकारण सुरूवातीपासूनच राहिले आहे. आख्खी भारतीय टीम सर्वच ब्राह्मण खेळाडूंनी भरलेला असायचा अपवादासाठी एखादा उच्चजातीय मुस्लिम आणि शिख घेऊन संघ भारतीय असल्याचे भासवले जायचे आणि कोट्यवधी लोकसंख्येच्या भारताचे लोक टाळ्या पिटत वारंवार पराभूत होणाऱ्या भारतीय संघाची पाठराखण करत. हा सिलसिला असाच बिनबोभाट सुरू होता; पण त्याला सुरूंग लावला तो शरद पवार यांनी. शरद पवार यांच्याशी आमचे राजकीय आणि सामाजिक पातळीवर देखील वैचारिक मतभेद आहेत. त्यांच्या राजकीय-सामाजिक भूमिकेवर अनेकदा आम्ही सडकून टीका केली. परंतु, भारतीय क्रिकेटला त्यांनी दिलेला अब्राह्मणी आयाम आणि त्यातून क्रिकेट क्षेत्रात जगज्जेता झालेला भारत आपण सर्वांनी पाहिला! याचे यथोचित वर्णन आम्ही करतोच आहोत, तत्पूर्वी आजचा क्रिकेट हा विषय लिखाणाला का घेतला, याचे थोडक्यात स्पष्टीकरण देतो. विराट कोहली हा खेळाडू खेळात अगदी प्राविण्य आणि दबदबा असणारा खेळाडू. महेंद्रसिगं धोनी या जागतिक उंची गाठलेल्या आणि भारतीय क्रिकेट ला जगज्जेता बनविणारा महान खेळाडू-कर्णधाराची जागा विराट कोहली ला मिळाली, ती केवळ त्याच्या प्रतिभेच्या जोरावर. एकदा सचिन तेंडुलकर ने त्यांच्याविषयी म्हटले होते की, माझे विश्वविक्रम भविष्यात मोडणारा खेळाडू म्हणजे विराट. अशा या खेळाडूचे मैदानावरील रागिट वर्तन किंवा खेळाडूंवर प्रसंगी रागावण्याचा स्वभाव हा एक अपवाद वगळला तर त्याला भारतीय क्रिकेट च्या दोन प्रकारच्या क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्याचे तसे कोणतेही पुरेसे कारण नाही. परंतु, त्याला ट्वेंटी ट्वेंटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून दिलेला डच्चू हा शरद पवार यांनी क्रिकेटमध्ये ब्राह्मणेतर आणि त्यातही भारताच्या ग्रामीण जिल्ह्यातून दिलेले प्रतिनिधित्व हे प्रस्थापित व्यवस्थेला खूपणारे होते. त्यामुळे त्यांनी जय शहा या नितीन राऊत यांच्या शब्दातील ‘शाहजादे’ असणाऱ्या अध्यक्षाच्या माध्यमातून पुन्हा ब्राह्मण कर्णधार देऊन भारतीय क्रिकेट ला जवळपास पंधरा वर्षांनी ब्राह्मणी नेतृत्वाखाली आणले. शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम क्रिकेटमध्ये भारताने जगज्जेता व्हावं, हे स्वप्न पाहिलं, जाहीर केलं आणि त्यानुसार कृती सुरू केली. त्यांचा पहिला निर्णय म्हणजे झारखंड सारख्या दुर्गम राज्यातील खेळाडू ला कर्णधार बनवणं. त्यानंतर केवळ पंच्याहत्तर टक्के खेळाडू हे एकट्या मुंबईतील ब्राह्मण असत, याबाबीला देखील त्यांनी सुरूंग लावत भारतभरातील युवकांना निवड समितीच्या माध्यमातून त्यांनी संधी दिली. व्यावसायिक कारणास्तव बिभत्स वळणावर गेलेल्या आयपीएल सारख्या क्रिकेट प्रकारातून अनेक समुहातील भारतीय युवकांना संधी दिली. हा सगळा प्रकार अब्जोची दुनिया असलेल्या क्रिकेटमध्ये खपवून घेणं ब्राह्मणी शक्तींना शक्यच नव्हते. ते स्वतः यात भूमिका निभावू न शकल्याने बनिया नेतृत्व जय शाह च्या माध्यमातून त्यांनी आणले. शास्त्री सारखे संवाद सभ्यता नसलेल्या व्यक्तिला अनेक वर्षे कोच ठेवून त्यांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केविलवाणा ठरला. याउलट, धोनीच्या काळात विदेशी कोच आणि ब्राह्मणेतर कर्णधार या अफलातून समिकरणाने भारत एकदिवसीय, ट्वेंटी ट्वेंटी आणि कसोटी अशा सर्वच क्रिकेट प्रकारात जगज्जेता बनला होता. भारतीय ब्राह्मणी प्रवृत्तींना भारताचे असे शक्तिशाली रूपच नको असते का? केवळ एकजातीय ‘संघ’ बनवून क्रिकेट जगतात भारताला कमजोर बनवणारे आहे, अशी आमची ठाम धारणा आहे. त्यामुळे विराट कोहली सारखा खत्री समुदायातून येणाऱ्या खेळाडूला कर्णधार पदावरून अगदी सहज डच्चू देणं खटकणारे आहे. अर्थात, विराट हा देखील उथळ प्रवृत्ती असणारा खेळाडू आहे, ज्याने महेंद्रसिगं धोनी ला डच्चू देण्यासाठी ब्राह्मणी प्रवृत्तींकडून त्याचा वापर होऊ दिला. थोडक्यात सांगायचे तर भारतीय क्रिकेट चे पुन्हा ब्राह्मणीकरणाची एक परिक्रमा यातून पूर्ण झाली, असे आम्हाला वाटते!

COMMENTS