Homeताज्या बातम्या

मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत; बीडमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

बीड: येथील धानोरा रोडवरील चांदमारी परिसरात असलेल्या मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांचे वसतिगृह येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची प्रवेश प्रक्रिया अ

युरिया मिळत नसल्याने संगमनेरमध्ये शेतकऱ्यांचा नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोको; माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
राज्यात आज ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’; ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
शोल्डर- मलबार हिल शाखा अंतर्गत पश्‍चिम उपविभागातमेन – शासकीय बंगल्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा; सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय निधीची लूट; अधिकार्‍यांची संगनमताने मिलीभगत : डॉ. अशोक सोनवणे
मातोश्री शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट; तब्बल एक कोटीहून अधिकचा खर्च  Mumbai Marathi News | matoshree government hostel will be transformed  expenditure of more than one crore | Latest ...

बीड: येथील धानोरा रोडवरील चांदमारी परिसरात असलेल्या मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांचे वसतिगृह येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत

माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग, महाविद्यालयीन विभाग, आय.टी.आय., आणि तंत्रनिकेतन विभागातील प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी दि. २२ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आपले प्रवेश अर्ज सादर करायचे आहेत. सर्व शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून, कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील. विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक व योग्य कागदपत्रांसह अंतिम मुदतीच्या आत परिपूर्ण भरून कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.

पुनर्प्रवेशासाठी ६० टक्के गुणांची अट

ज्या विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात याच वसतिगृहात प्रवेश घेतला होता आणि त्यांना या वर्षी पुनर्प्रवेश हवा आहे, अशा जुन्या विद्यार्थ्यांसाठी किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही गुणांची अट पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांनीच पुनर्प्रवेशासाठी अर्ज सादर करावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS