दिपावली सणातून प्रत्येकाच्या जिवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा – ना थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिपावली सणातून प्रत्येकाच्या जिवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा – ना थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी )  दिपावलीचा सण संपुर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो भारतीय संस्कृतीत या सणाचे विशेष महत्व असून घरोघरी पेटवली जाणारी

आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट
थोरातांकडे येणार प्रदेश काँगे्रसची सुत्रे ?
समन्यायी कायद्याबाबत आम्ही भांडत होतो तेव्हा ‘ते’ का गप्प होते – ना.थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी ) 

दिपावलीचा सण संपुर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो भारतीय संस्कृतीत या सणाचे विशेष महत्व असून घरोघरी पेटवली जाणारी पणती अंधार दुर करुन प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करते. मागील दोन वर्षात कोरोनासह विविध  संकटे आली. आता ती दूर होवून पुन्हा प्रत्येकाच्या जिवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा अशा शुभेच्छा राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहे.

            अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमध्ये नामदार थोरात यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन करण्यात आले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्यात झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत ॲड माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ.हसमूख जैन,डॉ.जयश्री थोरात,बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मणराव कुटे,अमित पंडित,गणपतराव सांगळे,आर एम कातोरे,संतोष हासे,हौशीराम सोनवणे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,चिफ अकाऊटंट अमोल दिघे,संदिप दिघे,किरण कानवडे आदि उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा बँक, अमृतवाहिनी बँक,राजहंस दुध संघ,शॅम्प्रो,हरिश्चंद्र फेडरेशन येथे ही लक्ष्मीपूजन करण्यात आले  तर कारखाना कार्यस्थळावर श्री व सौ राऊत यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलतांना ना थोरात म्हणाले कि, भारतीय संस्कृतीत दिपोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या सणात लहान थोर सर्व आनंदाने सहभागी होतात. राज्यात या वर्षी कोरोनाच संकट आहे. या दिवाळीत कोरोना कायमचा नष्ट होवून पुन्हा एकदा सर्वांना मोकळे जिवन जगता यावे ही प्रार्थना आहे. मागील वर्षात अनेक संकटे आली. यापुढे ती येऊ नये व प्रत्येकाला पुन्हा एकदा आनंदी जिवन जगता यावे. अमृत उद्योग समूहाने सर्व सामान्यांच्या विकासाकरीता काम करत अत्यंत चांगली वाटचाल केली असून तालुक्यातील जनतेच्या जिवनात आनंद निर्माण केला आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रात २०० प्रति टन प्रोत्साहनपर अनुदान दिले असून २० टक्के बोनस दिला आहे. दुध संघाने दिवाळी निमित्त शेतकऱ्यांना रिबेट दिले असून संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. दिपावली निमित्त सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावे असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिफ अकाऊटंट अमोल दिघे तर आभार कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी मानले.

COMMENTS