Homeताज्या बातम्या

कुंडलवाडी पोलिसांची धडक कारवाई;  3.08 लाखांचा गुटखा, दोन स्कुटी व मोबाईल जप्त

 कुंडलवाडी पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या  गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 3 लाख 8 हजार 579 रुपयांचा मुद्देमाल

मठाचीवाडीत घरफोडी; दहा लाखांचा ऐवज लंपासउघड्या दरवाजाचा फायदा; सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकड लांबवली
दौंडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परिसरात काढली जाहीर धिंड!
मुंबई, पुणे व नागपूरातील कार्यालयांना स्फोटाची धमकीमहापौर कार्यालयासह आरएसएसच्या मुख्यालयाचा समावेश



 कुंडलवाडी पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या  गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 3 लाख 8 हजार 579 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7.40 वाजण्याच्या सुमारास कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर शिवारात हनुमान मंदिराजवळ, नागणी-कुंडलवाडी मार्गावर ही कारवाई करण्यात आली.  या प्रकरणी पोलीस हवालदार संतोष गंगाधर संगेवार यांनी फिर्याद दिली असून, मोहम्मद आनजफ मोहम्मद आजम (वय 26, रा. मदिना मस्जिदजवळ, नायगाव खै) व सय्यद जुबेर सय्यद करीम (वय 29, रा. पानसरे नगर, नायगाव खै) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून त्यांच्या ताब्यातील स्कुटींवर पांढर्‍या पोत्यांमध्ये व बॅगमध्ये आर.एम.डी., व्ही-1, विमल गुटखा, राजनिवास, सागर, एस.आर.-01, झेड-एल.-01 तसेच इतर विविध कंपन्यांचा मानवी आरोग्यास हानीकारक व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विनापरवाना बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी 68 हजार 579 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, आरोपी मोहम्मद आनजफ याच्याकडील 1 लाख रुपयांची सुझुकी बर्गमन (एमएच-26-सीटी-2622) स्कुटी, 30 हजार रुपयांचा आयफोन-16 मोबाईल, आरोपी सय्यद जुबेर याच्याकडील 1 लाख रुपयांची होंडा अ‍ॅक्टिव्हा (एमएच-26-डीसी-1246) स्कुटी तसेच 10 हजार रुपयांचा व्हिवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 3 लाख  8 हजार 579 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गु.र. क्र. 85/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 26(2)(1), 26(2)(4), 27(3)(ई), 3(1)(झेड)(4), 30(2) व 59 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी, पोहेकॉ. सुनील दस्तके, पोहेकॉ. संतोष संगेवार, पो.कॉ. आनंद बोडके व पो.कॉ. रघुवीर चौहान यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. कुंडलवाडी पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.पूढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे करीत आहे.

COMMENTS