Homeताज्या बातम्या

शरद पवारांनी मोठ्या मनाने निर्णय घ्यावाविलिनीकरणासाठी सुनेत्रा पवारांचे नेतृत्व मान्य करावे-आ. चिखलीकर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच लोहा-कंधार मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप पाटील

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाढली अस्वस्थता? ‘मला ४२ वर्षांचा राजकीय अनुभव’ : सुनील तटकरे
81 लाख महिलांना वगळले बहिणींनो सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे
महायुतीचा ‘राजकीय चेकमेट’; अमरनाथ राजुरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, विरोधकांची सर्व गणिते कोलमडलीआपकी बार 400 पार …



राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच लोहा-कंधार मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विलिनीकरणाचा निर्णय घेतल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चिखलीकर म्हणाले की, पक्षाच्या संघटनात्मक रचनेनुसार सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे विलिनीकरणाच्या प्रक्रियेत त्यांचे नेतृत्व मान्य करणे ही केवळ औपचारिकता नसून संघटनात्मकदृष्ट्या क्रमप्राप्त बाब आहे. त्यामुळे कोणतेही विलिनीकरण नेतृत्वाच्या प्रश्नावर अडकू नये, असेही त्यांनी सूचित केले. पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जर विलिनीकरण करायचे असेल, तर सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व स्वीकारूनच तो निर्णय व्हायला हवा. त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व सर्वांनी मान्य करणे अपेक्षित आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मोठ्या मनाने या प्रक्रियेला मान्यता द्यावी, असे वैयक्तिक मत चिखलीकर यांनी मांडले. चिखलीकर यांच्या या वक्तव्याकडे केवळ एका आमदाराची प्रतिक्रिया म्हणून न पाहता, महायुतीतील राजकीय संकेत म्हणूनही पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये नेतृत्वाचा मुद्दा निर्णायक ठरू शकतो, अशा पार्श्वभूमीवर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा मुद्दा पुढे करून राजकीय चर्चेला नवे परिमाण दिले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर चिखलीकर यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी धार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आता शरद पवार गटाकडून या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS