Homeताज्या बातम्या

थार मधून होत होती प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक; मरखेल पोलिसांची कारवाई

नांदेड : डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याच्या अवैध वाहतुकीविरोधा

जयंतीच्या उत्सवाला गालबोट; चंद्रपुरात नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या!
नागपुरात 5 लाखांची लाच घेणार्‍या अधिकार्‍याला अटक
जनावरे चोरी करणार्‍या तिघांना अटक, बोलेरोसह 4.15 लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड : डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलीस स्टेशन मरखेल यांनी मोठी कारवाई करत 22 लाख 60 हजार 560 किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे.
6 जुलै 2026 रोजी पोलीस स्टेशन मरखेल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी माधवराव हंडेकर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, महिंद्रा थार (क्र. एम एस 26-38-ए के-0088) या वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित पान मसाला विक्रीसाठी वाहतूक केला जात आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पंचांसमक्ष हणेगाव-तुंबरपल्ली रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे 11.30 वाजता सदर वाहन अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये विविध कंपन्यांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला. या कारवाईत विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला, महिंद्रा थार वाहन तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण 22 लाख 60हजार560560 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अक्षय गुरुदत्त डंडेरिया (वय 33 वर्षे, रा. कपडा गल्ली, हिंगोली) व दिपक लक्ष्मण शर्मा (वय 27 वर्षे, रा. मंगळवार, हिंगोली) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पो. स्टे. मरखेल गु.र. नं. 110/2026 भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 123, 274, 275, 223, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 23, 26(2), 27, 30(2)(अ) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी माधवराव हुडेकर, पोलीस अंमलदार येंगाळे, वेलकर, बोडेमवाड व दोसेलवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

COMMENTS