Homeताज्या बातम्या

शेवगावमध्ये सागवान लाकडाची अवैध वाहतूकवन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

शेवगाव :   तालुक्यात सागवान   लाकडाची अवैध वाहतूक वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. रात्रीच्या वेळी तसेच दुर्गम मार्गांचा वापर करून मौल्यवान सागवान लाकूड वाहून नेले जात असल्याच्या तक्रारी असून, ही अवैध वाहतूक रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वन विभागाकडून नियमित गस्त (पेट्रोलिंग) होत नसल्याने लाकूड तस्करांचे मनोबल वाढले आहे. जंगल परिसरातील हालचालींवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे अवैधरित्या तोड करण्यात आलेले सागवान लाकूड विविध वाहनांद्वारे इतर भागात नेले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.वन विभागाच्या नियमानुसार सागवान किंवा अन्य मौल्यवान वनउत्पादनाची वाहतूक करण्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची वैध परवानगी  आवश्यक असते. परवानगीशिवाय सागवान लाकूड साठवणे, खरेदी-विक्री करणे किंवा वाहतूक करणे हा वन कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा मानला जातो. वाहतुकीदरम्यान संबंधित कागदपत्रे वाहनचालकाकडे असणे बंधनकारक असून, तपासणीदरम्यान ती सादर करावी लागतात. नियमांचे उल्लंघन झाल्यास लाकूड, वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. नागरिकांनी शेवगाव तालुक्यातील संवेदनशील भागात नियमित गस्त वाढवून अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वन विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवून संबंधितांविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वनविभागाच्या अनास्थेमुळे तामसा भागात वृक्षतोड सुरुच
शेवगाव-पाथर्डीत अवैध वृक्षतोडीवर वन विभागाची कारवाई 
मुसळधार पावसात वनविभागाची गस्त; चिखली परिसरात 8 तस्कर लाकूड टाकून पसार

COMMENTS