Homeताज्या बातम्या

सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनास केजकरांचा पाठिंबा; विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध!

केज: नीट पेपर फूटप्रकरणी देशात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेस जबाबदार धरत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्

मतभेद असणं म्हणजे असंस्कृतपण नव्हे !
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सामाजिक उपक्रम
खा. नागेश पाटील यांचा ताफा अडवल्याप्रकरणी बबनराव बारसे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा

केज: नीट पेपर फूटप्रकरणी देशात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेस जबाबदार धरत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, यासाठी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथे उपोषण सुरू असताना सरकारने त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले.

तसेच जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष व निर्दयपणे लाठीमार करण्यात आला. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी केज शहरातून भव्य मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

भवानी चौक ते तहसील कार्यालय दरम्यान निघालेल्या या मोर्चात ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना मागणीचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

या मोर्चात हनुमंत भोसले, हनुमंत घाडगे, भाई मोहन गुंड, शिवरुद्र आकुस्कर, रामदास साबळे, प्रवीण सरवदे, गजानन भांगे, शिवाजी पोळ, व्यंकट घोगले, अमोल मस्के, वसंत डोईफोडे, मनोज दांगट, शिवाजी ठोंबरे, योगीराज जाधवर, प्रकाश काळे, हिराचंद काळे, विलास ओव्हाळ, इकबाल शेख, तात्या गवळी, दया घुंडरे, सदाशिव तांदळे, शारदा गुंड, राधा सपकाळ, सविता आकुसकर, राधाताई सपकाळ, डॉ. हनुमंत सौदागर यांच्यासह केज शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS