Homeताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सामाजिक उपक्रम

माजलगाव: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शनिवार, १ ऑगस्ट रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) यांच्या वतीने तालुक्यातील ग

परळी पंचायत समिती कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन! विकास व जनसेवेतील योगदान सदैव प्रेरणादायी: राजवर्धन भोसले
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा खाजगी बाजार तेजीत; मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ़ यांचा गंभीर आरोप
शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष

माजलगाव: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शनिवार, १ ऑगस्ट रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) यांच्या वतीने तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी तसेच शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. “शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद असून आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,” या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राकेश साळवे यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

तालुक्यातील सर्व गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) तालुकाध्यक्ष राकेश साळवे, युवक तालुकाध्यक्ष अमित खर्डे तथा विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ ससाणे यांनी संयुक्तपणे केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम शिक्षणाबरोबरच सामाजिक ऐक्य, समता आणि मानवतेचा संदेश देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS