Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूल ची कार्यवाही बळेगाव येथील चार वाळू तस्कंराविरुद्धात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शहागड प्रतिनिधी - अबंड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची गुप्त बातमी खबर्‍या मार्फत अबंडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना

काळजाचा थरकाप उडवणारे हत्याकांड.
रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच
रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर सुरू झाला पॉर्न व्हिडिओ

शहागड प्रतिनिधी – अबंड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची गुप्त बातमी खबर्‍या मार्फत अबंडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना मिळताच त्यांनी महसूल पथकातील मंडळधिकारी  संजय भिसे सह  पथकातील प्रविण लक्ष्मण पवार महसुल सहायक, बी एल. सानप तलाठी सजा आपेगाव, सतीष राक्षे बनगाव  कोतवाल, असे बळेगाव येथे  बारा नंबर चारी जवळ थांबलेले असतांनाच  दहयाळा रोडवर  बिनाक्रमांकाचे वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर दहयाळाकडे जात असतांना दिसले त्याचा पाठलाग केला  ट्रॅक्टर न थांबता सुसाटवेगाने निघुन जात होते दोन्ही ट्रॅक्टर मध्ये अंदाजे प्रत्येकी एक ब्रास वाळु होती. स्थानिक चौकशी केली असतांना ट्रॅक्टर चालकाचे नाव घनश्याम काकाजी नरवडे,  ट्रॅक्टर मालक रखमाजी शिवाजी नरवडे दो रा .बळेगाव ता. अंबड मॉडेल क्रमांक 555 अर्जुन तसेच  ट्रॅक्टर मालक नितीन राजेभाऊ नरवडे व चालक अशोक ज्ञानदेव नरवडे दोघे रा .बळेगाव ता. अंबड ट्रॅक्टर मॉडेल नं 575 महींद्रा असे असल्याचे स्थानिकांनी सांगितले सदर घटनेचा सविस्तर पंचनामा करून  विनाक्रमांकाचे पळुन गेलेल्या ट्रॅक्टर चालक व मालकाविरुध्द कलम 379,34 भादवी सह.क 3 व 4 गौण खनिज कायदा प्रमाणे गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास जमादार नारायण माळी, गोपाल दिलवाले हे करीत आहेत.

COMMENTS