Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापौर कार्यालयातून ‘अनधिकृत सत्ता’ चालतेय का? संतोष मुळे यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मनपा प्रशासनात खळबळ

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजात महापौर कविता मुळे यांचे पती संतोष मुळे यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मनपा प्रशासना

पीरबु-हान नगर सबस्टेशनवरून श्रेयवाद तापला;उपकेंद्र मंजुरीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आमनेसामने; नागरिक मात्र अखंडित वीजपुरवठ्यच्या प्रतीक्षेत
सत्तेसाठी एकत्र, श्रेयासाठी आमनेसामने; 33 केव्ही उपकेंद्रावरून भाजपा-शिवसेना संघर्ष
अक्षय तृतीयेनिमित्त सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा; 3 हजार ग्लास ऊसाच्या रसाचे वाटप
कविता मुळे नांदेडमध्ये भाजपाच्या पहिल्या महापौर! उपमहापौरपदासाठी दीपकसिंह  रावत यांचे नाव निश्चित, दोघांचे अर्ज दाखल - Marathi News | Kavita Mule  Elected ...


नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजात महापौर कविता मुळे यांचे पती संतोष मुळे यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मनपा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. कोणतेही निवडून आलेले पद अथवा संवैधानिक अधिकार नसताना ते विविध प्रशासकीय बैठकींना उपस्थित राहत असून विभागप्रमुखांना थेट आदेश देत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याची चर्चा सुरू आहे.
महापौरांचे कार्यालय आणि अँटी चेंबरमधून संतोष मुळे हे विविध विभागांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आहे. अनेक विभागप्रमुखांना बोलावून कामांचा आढावा घेणे, फाईलींबाबत सूचना करणे तसेच अधिकार्‍यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीमुळे महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे तसेच उपायुक्तही हतबल झाल्याची भावना प्रशासनात व्यक्त होत आहे. महापौर कविता मुळे या दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून सभागृहातील कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात पतींचा वाढता हस्तक्षेप आता उघडपणे चर्चिला जाऊ लागला आहे. महापौरांच्या शासकीय वाहनातून प्रवास करण्यापासून ते अधिकार्‍यांशी थेट संपर्क साधण्यापर्यंत अनेक बाबींमध्ये संतोष मुळे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. स्थायी समिती किंवा इतर समित्यांच्या बैठकींना ते कोणत्या अधिकाराने उपस्थित राहतात, असा सवालही उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार अशा बैठकींमध्ये केवळ अधिकृत पदाधिकार्‍यांनाच सहभागाचा अधिकार असताना एका नातेवाईकाचा वाढता वावर प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. महापालिकेतील काही नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप पदाधिकार्‍यांमध्येही या परिस्थितीबद्दल नाराजी असल्याचे बोलले जात आहे. कामासाठी महापौरांकडे जाण्यापूर्वी संतोष मुळे यांच्याकडे संपर्क साधावा लागत असल्याची भावना अनेकांमध्ये निर्माण झाली आहे. काही संचिका आणि प्रस्ताव आधी त्यांच्या पाहणीतून जात असल्याचीही चर्चा आहे. महिला आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात असताना प्रत्यक्षात त्यांच्या नातेवाईकांकडून कारभार चालवला जात असेल, तर महिला आरक्षणाच्या उद्देशालाच धक्का बसत असल्याची टीका आता राजकीय वर्तुळात होत आहे. महापौरांचा रिमोट कंट्रोल पतींकडे आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि नियमबाह्य हस्तक्षेप रोखण्यासाठी कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS