Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडचे भाजपा संघटनेवरील महत्त्व कमी झाले!

देड : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्यविस्तार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय समन्व

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
किनवट नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना वेग; ’स्वीकृत’ पदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध वर्णी!
कल्याणकरांविरोधातील कारस्थानांचा पर्दाफाश होणार?शिवसेना नेतृत्वाने निष्ठावंतांना न्याय द्यावा; फंदफितुरी करणार्‍यांवर कारवाईची मागणी
भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध  निवड | डीडी न्यूज ऑन एअर

देड : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्यविस्तार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या यादीमुळे मराठवाड्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाला नव्याने उधाण आले आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्याचे संघटनात्मक वर्चस्व संपुष्टात आल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत असून, काही नियुक्त्यांभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपच्या जुन्या संघटनात्मक रचनेत मराठवाडा विभागातील ‘विभागीय संघटनमंत्री’ हे पद अत्यंत प्रभावशाली मानले जात होते. या पदाच्या माध्यमातून संघटन विस्तार, निवडणूक नियोजन, कार्यकर्त्यांचे समन्वय आणि जिल्हानिहाय राजकीय रणनीती ठरवली जात होती. अनेक वर्षे या पदावर नांदेडचा प्रभाव राहिला होता. मात्र, नव्या रचनेत हे पदच अप्रत्यक्षपणे इतिहासजमा झाल्याचे चित्र आहे. परिणामी, नांदेडमधील भाजप नेतृत्वाची पकड कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाड्यात भाजप संघटनेत प्रभाव राखणारे माजी विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांनाही नव्या फेररचनेत मर्यादित जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. पक्षातील त्यांच्या प्रभावाला मोठा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  त्याचवेळी विधान परिषदेचे आमदार तथा पक्षाचे प्रदेश महामंत्री संजय केणेकर यांच्याकडे कोणतीही संघटनात्मक जबाबदारी देण्यात आलेली नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मराठवाडा विभागाच्या समन्वयकपदी मुंबईचे आमदार सुनील राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक नेतृत्वाला डावलून मुंबईतील नेत्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांच्यासोबत जालना जिल्ह्यातील राहुल लोणीकर यांची विभाग सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक चर्चा मात्र विभाग संयोजकपदाच्या नियुक्तीवरून सुरू झाली आहे. भाजपने ‘ड. नितीन काळे’ यांची विभाग संयोजक म्हणून नियुक्ती जाहीर केली. मात्र, धाराशिव जिल्ह्यात या नावामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, जिल्ह्यात ‘डव्होकेट’ म्हणून अनिल काळे अधिक परिचित आहेत, तर नितीन काळे हे व्यवसायाने अभियंता असल्याचे सांगितले जाते. अधिकृत पत्रकात ‘ड. नितीन काळे’ असा उल्लेख आल्याने नियुक्ती नेमकी कोणाची, यावर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे. पक्षाच्या अधिकृत पत्रकातील या तांत्रिक त्रुटीमुळे संभ्रम अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपने नव्या संघटनात्मक रचनेद्वारे आगामी निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत असले, तरी मराठवाड्यातील नाराजी, नांदेडच्या नेतृत्वाची उपेक्षा आणि नियुक्त्यांमधील गोंधळ यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता उघडपणे समोर येत आहे. आता प्रदेश नेतृत्व हे नाराजीचे सूर कितपत शांत करते, याकडे मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS