Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अक्षय तृतीयेनिमित्त सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा; 3 हजार ग्लास ऊसाच्या रसाचे वाटप

नांदेड : अक्षय तृतीयेच्या पावन निमित्ताने सुशील बहू मंडळातर्फे वजीराबाद येथील गुरु गणेश जैन स्थानक येथे सेवाभावाचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. म

महात्मा बसवेश्‍वर यांची ’अक्षय’ विचारधारा सर्वात प्रभावी : डॉ. उपाध्ये
भेंडवळची घट मांडणी: यंदा कापूस अन् ज्वारीला सोन्याचे दिवस; तर राजा कायम राहील मात्र तणावात
भेंडवळच्या भविष्यावरून अंनिसचे खुले आव्हान;श्याम मानव यांनी जाहीर केले 80 लाखांचे बक्षीस

नांदेड : अक्षय तृतीयेच्या पावन निमित्ताने सुशील बहू मंडळातर्फे वजीराबाद येथील गुरु गणेश जैन स्थानक येथे सेवाभावाचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. मंडळाच्या वतीने सुमारे 3 हजार ग्लास ऊसाच्या रसाचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर कविता  मुळे तसेच नगरसेवक सुमित मुथा उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सेवाभावाची ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. जैन धर्मात अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व असून, दान, तप, त्याग आणि सेवेसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. भगवान आदिनाथांचे वर्षीतप याच दिवशी पूर्ण होऊन त्यांचे पारणे झाले होते, त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होते. याच पार्श्वभूमीवर मंडळाने हा सेवा उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी सुशील बहू मंडळ व युवक मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणार्‍या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.

COMMENTS