Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही : महापौर कविता मुळे

नांदेड : पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत, तांत्रिक अडचणींमुळे प्

किनवटमध्ये दिव्यांग कर्मचार्‍याला नगरसेवकाची मारहाण; काम बंद आंदोलनाचा इशारा!
शहरातील ओपन स्पेस व गायरान जमिनींचे तात्काळ नियोजन करानगरसेवक मंगेश धोंगडे यांची आक्रमक मागणी
भाजप नगरसेवक पती सागर देशपांडे प्रकरण; खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी; एसपींची भेट घेऊन शिष्टमंडळाकडून निवेदन

नांदेड : पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत, तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी प्रशासनाला दिले.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत महापौरांनी शहरातील घरकुल योजनांची सविस्तर प्रगती तपासली. बैठकीस उपमहापौर दीपकसिंह रावत, सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, सभागृह नेते अ‍ॅड. महेश कनकदंडे, नगरसेवक उमेश चव्हाण, अभिषेक सौदे, संजय घोगरे, किशोर भवरे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त नितीन गाढवे, विभाग प्रमुख प्रकाश कांबळे, उपअभियंता हफिजउल्ला खान आदी उपस्थित होते. मंजुरी मिळूनही अपूर्ण राहिलेल्या घरकुलांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ज्या लाभार्थ्यांचे बांधकामाचे टप्पे पूर्ण झाले आहेत, त्यांना पुढील हप्ते वेळेवर मिळावेत, जेणेकरून कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. नवीन लाभार्थी नोंदणी (झच-ध 2.0) तसेच प्रलंबित अर्जांची पडताळणी करून तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. घरकुल बांधकामात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, असे महापौरांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही दलालांच्या माध्यमातून फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक, महापौर किंवा संबंधित अधिकार्‍यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गरीबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर कविता मुळे यांनी यावेळी नमूद केले.

COMMENTS