Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील चंदननगरमध्ये लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा चिरला गळा

पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नास नकार मिळाल्याच्या रागा

किनवट वन विभागाची ’सिंघम’ स्टाईल कारवाई; सागवान तस्करी करणारा पिकअपसह आरोपी जेरबंद
हद्दपार गुन्हेगारांचे जामखेडमध्ये वास्तव्य; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद; गुन्हा दाखल
मणिपूरमध्ये शस्त्र 1800 किलो अफूसह दोघे जेरबंद
चाकूने प्रेयसीचा गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न; माणिकगड किल्ल्यावरील  घटना Chandrapur Marathi News | Attempted suicide by slitting girlfriend's  throat with knife; Incident at ...

पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नास नकार मिळाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या परिचित तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार वस्तूने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतही तरुणीने धैर्य दाखवत भावाला दृकश्राव्य दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याने तिच्यावर वेळेत उपचार सुरू होऊ शकले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप राठोड (वय 22) आणि पीडित तरुणी एका व्यापारी संकुलात काम करत होते. कामाच्या ठिकाणी झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली होती. मात्र, तरुणीचे लग्न अन्यत्र ठरणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी संतप्त झाला होता. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्या घरी गेला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने तिच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार केले. हल्ल्यानंतर तरुणी गंभीर जखमी होऊन घरातच कोसळली. जखमी अवस्थेतही तिने धैर्य न गमावता आपल्या भावाला दूरध्वनी केला. बोलताना तिला स्पष्ट आवाजही काढता येत नव्हता. माझ्यावर हल्ला झाला आहे, लवकर घरी ये, असे सांगत तिने भावाशी दृकश्राव्य संपर्क साधला. बहिणीची रक्तबंबाळ अवस्था पाहून भावाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टर आणि पोलिसांनी हल्लेखोराबाबत विचारणा केली असता, जखमांमुळे तरुणीला बोलणे शक्य नव्हते. तिने कागद आणि पेन मागवून थरथरत्या हाताने आरोपीचे नाव लिहून दिले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीला अटक केली. सध्या जखमी तरुणीवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS