Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

28 लाखांच्या लाचप्रकरणी महिला पोलिस अधिकारी निलंबित

पुणे : जमिनीच्या प्रकरणात मोठ्या रकमेची लाच मागितल्याच्या आरोपात अडकलेल्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली

मणिपूरमध्ये शस्त्र 1800 किलो अफूसह दोघे जेरबंद
पेट्रोलपंपांवरील क्यूआर कोड घोटाळा उघड; नांदेड सायबर पोलिसांची धडक कारवाई; 3 आरोपी जेरबंद, 9.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
किनवट वन विभागाची ’सिंघम’ स्टाईल कारवाई; सागवान तस्करी करणारा पिकअपसह आरोपी जेरबंद
Pune Bribery Case : लाचखोर महिली अधिकारी निलंबित! ३० लाखांच्या लाचप्रकरणी  आधीचा कार्यमुक्तीचा आदेश रद्द - Dainik Prabhat

पुणे : जमिनीच्या प्रकरणात मोठ्या रकमेची लाच मागितल्याच्या आरोपात अडकलेल्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, त्यांची अलीकडील पदोन्नतीही रद्द करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोटेवार या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना एका जमिनीशी संबंधित तक्रारीची चौकशी त्यांच्या कडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणात त्यांनी तक्रारदाराकडे तीस लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने सुरुवातीला दोन लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी वेळ मागितला होता. यानंतर उर्वरित अठ्ठावीस लाख रुपये स्वीकारण्यासाठी तोटेवार यांनी तक्रारदाराला शहरातील बंडगार्डन परिसरातील एका नामांकित हॉटेलजवळ बोलावले. मात्र, ही रक्कम स्वतः न घेता त्यांनी त्यांच्या ओळखीतील संभाजी शिवाजी चव्हाण यांना ती स्वीकारण्यासाठी पाठवले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडून पैसे घेताना चव्हाण यांना रंगेहाथ पकडले. पुढील चौकशीत तोटेवार यांनीच चव्हाण यांना पैसे घेण्यासाठी पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

COMMENTS