देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथे कौटुंबिक वादातून जावयाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ३ मे रोजी रात्री उघडकीस आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवाजी सदू पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पवार यांचा पत्नी सुरेखा पवार व सासू सिताबाई यांच्यासोबत काही कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने दोघींनी मिळून शिवाजी पवार यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या वेळी पत्नी सुरेखा हिने दगड फेकून मारल्याने शिवाजी पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले. घटनेनंतर चांगदेव सदू पवार यांनी तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद चांगदेव सदू पवार यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये सुरेखा शिवाजी पवार हिला अटक करण्यात आली आहे. सासू सिताबाई हिच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथे कौटुंबिक वादातून जावयाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ३ मे रोजी रात्री उघडकीस आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवाजी सदू पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पवार यांचा पत्नी सुरेखा पवार व सासू सिताबाई यांच्यासोबत काही कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने दोघींनी मिळून शिवाजी पवार यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या वेळी पत्नी सुरेखा हिने दगड फेकून मारल्याने शिवाजी पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.
घटनेनंतर चांगदेव सदू पवार यांनी तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद चांगदेव सदू पवार यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये सुरेखा शिवाजी पवार हिला अटक करण्यात आली आहे. सासू सिताबाई हिच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

COMMENTS