गेवराई : गेवराई तालुक्यात लोकहिताच्या कामांमध्ये सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीकडून होत असलेल्या अडवणुकीला कंटाळून मौजे जळगाव मंजरा येथील असंख्य का

गेवराई : गेवराई तालुक्यात लोकहिताच्या कामांमध्ये सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीकडून होत असलेल्या अडवणुकीला कंटाळून मौजे जळगाव मंजरा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि भाजपा नेते बाळराजे पवार यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
जळगाव मांजरा येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यास यावेळी माजी जि प सदस्य शामराव राठोड, माजी पं स उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, माजी सरपंच सुभाषराव शिंदे, सरपंच सूर्यकांत शिंदे, दत्तप्रसाद जाधव, सरपंच कैलास माने, विजय डरफे, बंडू घोलप, मा. मुकुंद लांडे, सरपंच रितेश साबळे, कल्याण लांडे, माजी सरपंच महादेव खेत्रे, सरपंच नारायण गाडे, चेअरमन रमेश गायकवाड, महारुद्र खुणे, शहादेव बोबडे, विकास मीठे (फौजी), सुरेश लाखे, प्रकाश गाडे, गोकुळ घवाडे, उमेश खेत्रे, दामू मोरे आदींचे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, आज अभिमान वाटतो की, माझ्यासोबत काम करणार्या कार्यकर्त्यांची तिसरी पिढी आजही माझ्यासोबत काम करत आहे. मी आणि दादा मिळून आपणास येणार्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी एक जीवाने गावाच्या माणसाच्या विकासासाठी आणि भल्यासाठी काम करावे तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तुमचे कोणतेही काम अडवले जाणार नाही जर कोणी अडवत असेल तर त्याची माझ्याशी गाठ असेल असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. बाळराजे पवार म्हणाले की, जळगाव मांजरा हे गाव मी व आबांनी आजच दत्तक घेतले. या गावातील गावकर्यांच्या समस्या आम्ही जातीने लक्ष घालून सोडवू.रेशमांच्या धाग्यांनी श्रीमंतीचं स्वप्न साकारणार जळगाव मंजरा हे गाव. या गावातील तरुणांनी आपला स्टेटस बनवण्यासाठी कष्ट घ्यावेत. आपल्या कष्टावर मौज करणार्या नेत्यांना आजच्या तरुणांनी लवकरच ओळखले पाहिजे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन पंडित जिजा ईदगे, अनंतराव आंडिल, महारुद्र खुणे, गोविंद खुणे, श्याम इदगे, शहादेव बोबडे, राजाभाऊ इदगे, भाऊसाहेब जामकर, विठ्ठल खुणे, शहाजी इदगे, बापू ईकर, महादेव खुणे, दत्ता खुणे, झुंबर इदगे, दामोदर इदगे, संदिपान इदगे, संजय बोबडे, केशव इदगे, छत्रभुज इदगे, दादा इदगे, बदाम इदगे, ज्ञानेश्वर इदगे, माऊली जामकर, माऊली बोबडे, सुभाष इदगे, आनंद कांबळे, शहादेव खुणे, माऊली खुणे, रुस्तुम इदगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी गावकर्यांसह पंचक्रोशीतील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS