Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील जिल्हा परिषद शाळेचे यशस्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमात तृतीय क्रमांक

बीड : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील पोलीस ग्राउंड, बालेपीर येथे राष्ट्रीय उपक्रमांतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट (एसपीसी) कार्यक्रमाचे आयोजन करण्या

कौटुंबिक कलहातून पतीचा काटा काढला; आठ महिन्यांपूर्वीचा खून गेवराई पोलिसांकडून उघड
गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हेच माझे ध्येय-अमरसिंह पंडित;प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ
दिव्यांग तरुणावर अमानुष हल्ला; जिवे मारण्याचा प्रयत्न, तरीही किरकोळ गुन्हा दाखल

बीड : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील पोलीस ग्राउंड, बालेपीर येथे राष्ट्रीय उपक्रमांतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट (एसपीसी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील तब्बल 60 शाळांचे मूल्यमापन करण्यात आले.
या स्पर्धेत गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत परिक्षेत्रातून तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश शहाने, क्रीडा शिक्षक जगन्नाथ जाधव, डॉ. तात्यासाहेब मेघारे, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी दिलीपकुमार खेडकर आणि एसपीसी सदस्य पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांची उपस्थिती होती. हा उपक्रम अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी दिलीपकुमार खेडकर यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आला. नोडल ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस हवालदार सखाराम घोलप, पोलीस नाईक मिलिंद सारणीकर आणि पोलीस अंमलदार रोहित शिंदे यांनी परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये सायबर सुरक्षा, वाहतुकीचे नियम, पोलीस ठाण्याचे कार्यालयीन कामकाज तसेच शस्त्रांविषयी माहिती देण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण देऊन त्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

COMMENTS