Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग तरुणावर अमानुष हल्ला; जिवे मारण्याचा प्रयत्न, तरीही किरकोळ गुन्हा दाखल

गेवराई : शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या जन्मजात मुका-बहिरा दिव्यांग तरुणावर शेजार्‍यांनी कुर्‍हाडीच्या दांड्याने, काठीने व दगडाने बेदम मारहाण

जमिनीच्या वादातून उमापूरमध्ये शेतकर्‍याचे कडबा गांजी व टायर जाळले; वाहनांची तोडफोड, लाखोंचे नुकसानचकलंबा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याचा आरोपकारवाई न झाल्यास सोमवारी शेख कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा
योगेश फुलशंकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधनअर्जुन फुलशंकर यांना पुत्रशोक
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील जिल्हा परिषद शाळेचे यशस्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमात तृतीय क्रमांक

गेवराई : शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या जन्मजात मुका-बहिरा दिव्यांग तरुणावर शेजार्‍यांनी कुर्‍हाडीच्या दांड्याने, काठीने व दगडाने बेदम मारहाण करून गळा दाबत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शिंपेगाव शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना दि. 26 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता घडली.
रामेश्वर बलभिम कोठेकर (वय 24, रा. शिंपेगाव, ता. गेवराई) हा आपल्या शेतातील बाभळीच्या झाडाच्या फांद्या शेळ्यांसाठी तोडत असताना शेजारील ईटकुर येथील बाबासाहेब सखाराम मासाळ व चंदु सखाराम मासाळ यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी कुर्‍हाडीचा दांडा, काठी व दगडांनी रामेश्वरच्या हात, मांडी, पाय, नडगी व गुडघ्यावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. पाय मोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. इतकेच नव्हे तर, आज जिवंत सोडायचा नाही अशी धमकी देत दोघांनी रामेश्वरचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. रामेश्वर हा जन्मापासून मुका व बहिरा असल्याचे माहिती असूनही आरोपींनी त्याच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, चुलत पुतण्या ओम उर्फ श्रीकांत कोठेकर हा मदतीला धावून आला असता आरोपींनी त्यालाही ढकलून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुलाही आज मरायचे आहे का? अशी धमकी देत त्याला घाबरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच परत या शेतात पाय ठेवला तर जिवे मारून टाकीन अशी धमकीही देण्यात आली. या प्रकरणी जखमी रामेश्वरचा भाऊ परमेश्वर कोठेकर यांनी मादळमोही पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी आरोपींविरुद्ध केवळ किरकोळ अदखलपात्र गुन्हा (एनसीआर 256/2026) नोंदवल्याचा आरोप करण्यात येत आहे. गंभीर स्वरूपाच्या या घटनेतही कठोर कलमे न लावल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परमेश्वर कोठेकर यांनी पोलीस अधीक्षक बीड, उपविभागीय अधिकारी गेवराई तसेच संबंधित ठाणे प्रभारी यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला असून आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणात अपंगत्वाचा स्पष्ट गैरफायदा घेत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने पोलिसांकडून योग्य व कठोर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS