Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य कृषी महाविद्यालयात 257 विद्यार्थ्यांना निरोप; संस्कारांची शिदोरी घेऊन भावी अधिकारी नव्या क्षितिजाकडे

बीड : निरोप समारंभ हा केवळ आठवणींना उजाळा देणारा क्षण नसून नवीन संधी आणि कर्तृत्वाच्या प्रवासाची ती एक सुरुवात आहे. महाविद्यालयातील संस्कार आणि ज

दहावीचा निकाल जाहीर; मुलींनीच मारली बाजी ९२.०९ टक्क्यांसह राज्याचा निकाल लागला; कोकण विभाग टॉपवर
11 वी ऑनलाईन प्रवेशाचा श्रीगणेशा; 30 एप्रिलपर्यंत मुदत; नांदेड जिल्ह्यात तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन : माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांचे आवाहन
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू

बीड : निरोप समारंभ हा केवळ आठवणींना उजाळा देणारा क्षण नसून नवीन संधी आणि कर्तृत्वाच्या प्रवासाची ती एक सुरुवात आहे. महाविद्यालयातील संस्कार आणि ज्ञान तुमच्या आयुष्याच्या पुढील प्रवासात नक्कीच दीपस्तंभासारखे काम करेल,  स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करा असे प्रतिपादन आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा यांनी केले.
आदित्य कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभ आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा,  संचालक डॉ. आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा हे होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आदिती सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आदिती सारडा  म्हणाल्या की, आजचा दिवस संमिश्र भावनांचा आहे. विद्यार्थ्यांना निरोप देताना शिक्षकांच्या मनात हळहळ असली, तरी तुम्ही आयुष्याच्या नवीन टप्प्यावर यशस्वी व्हाल याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी या पवित्र प्रांगणात घेतलेल्या ज्ञानाच्या जोरावर आदित्य शिक्षण संस्थेचे नाव मोठे करावे. तर  प्राचार्य श्याम भुतडा म्हणाले की, निरोप म्हणजे कायमचे दूर जाणे नव्हे, तर नवीन जबाबदार्‍यांकडे वाटचाल करणे होय. आयुष्यात कितीही मोठ्या पदावर गेलात तरी माणुसकी जपा, असे आवाहन त्यांनी केले. प्राध्यापक व्हि.एस. मिसाळ  यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सुरज जाधव याने आपला प्रवास सांगताना संस्था नेहमीच पाठीशी उभी राहिल्याचे नमूद केले. तर सुगंधा कुंभार हिने प्राध्यापकांचे कष्ट आणि महाविद्यालयातील सर्वांगीण विकासाच्या संधींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. ठोके, डॉ. सातपुते, डॉ. खेडकर, डॉ. मुंडे, डॉ. मोरे, प्रा. मिसाळ, डॉ. एडके, डॉ. कुमार, प्रा. गव्हाणे, प्रा. बोरडकर, प्रा. धावणे, प्रा. राऊत यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS