Homeताज्या बातम्या

भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलच्या राज्य उपाध्यक्षांसह शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश; आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते सोहळा

नांदेड: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग देणार्‍या एका महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष ॲड. नदीम खान

मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्रांची तपासणी करा; माहिती अधिकारातून कागदपत्रे मागवा : तायवाडे यांचे ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन
तीन वर्षांपासून फरार असलेले ‘बॅग लिफ्टिंग’ प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी; कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल

नांदेड: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग देणार्‍या एका महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष ॲड. नदीम खान यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला, पुरुष आणि युवकांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वास, राज्यात राबविण्यात येणारी विकासाभिमुख धोरणे आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांमुळे प्रेरित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची भावना नव्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. पक्षप्रवेशानंतर आमदार आनंदराव बोंढारकर यांनी सर्व नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची अधिक प्रभावी सेवा करत विकासाची गती कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटनेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासकामांना प्राधान्य दिले जात असून त्याच विश्वासातून विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विनय गिरडे, शहरप्रमुख तुलजेश यादव, सुहास खराणे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळू मोरे, उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे, अवतारसिंह पहिरेदार, रविंद्रसिंह बुगई, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड, गीता पुरोहित, स्नेहा पाटील, लता चिंचोलीकर, माया जोगदंड, दीक्षा वनजे, सरस्वती मचकडवार, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख शेख सिराज, सचिन पवार, स्वराज यादव, जुबेर भाई, अनिता गोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS