Homeताज्या बातम्या

बोकारे कुटुंबाचे विविध मान्यवरांकडून सांत्वन; २८ जुलै रोजी श्रद्धांजली सभा

नांदेड: नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या मातोश्री श्रीमती बायनाबाई नामदेवराव बोकारे यांच्या नुकत्याच झालेल्

अंबाजोगाईत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक; लग्न लावून नवरी झाली पसार, राहाता पोलिसांत गुन्हा दाखल
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन; सोयाबीन पिकासाठी विषमुक्त शेतीचा संदेश

नांदेड: नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या मातोश्री श्रीमती बायनाबाई नामदेवराव बोकारे यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखद निधनानंतर विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी बोकारे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, महापौर कविता संतोष मुळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, शीख समाजाचे प्रतिनिधी आणि विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी बोकारे कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बोकारे कुटुंबीयांना धीर देत स्वर्गीय बायनाबाई बोकारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, सोमवार, दि. २८ जुलै रोजी सोमेश्वर (ता. नांदेड) येथील हनुमान मंदिर परिसरात स्व. बायनाबाई बोकारे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभा व तेरावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तानाजी नामदेवराव बोकारे, देवीदास नामदेवराव बोकारे, पंढरीनाथ नामदेवराव बोकारे (ज्येष्ठ पत्रकार) आणि प्रा. दत्तात्रय नामदेवराव बोकारे (सोमेश्वरकर) यांनी केले आहे.

COMMENTS