Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेलवर छापा; चार पीडित महिलांची सुटका; जातेगाव शिवारात कारवाई; दोन आरोपी ताब्यात

अहिल्यानगर :  जातेगाव शिवारातील हॉटेलवर छापा टाकून अनैतिक व्यवसाय प्रकरणी चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घ

‘स्थानिक’च्या निवडणुकांत मनसेचा विजयाचा निर्धार; सुपा येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक; संघटन विस्तारवर भर
शेवगावच्या बी डी ओ सोनल शहा यांची अखेर बदली रद्द
सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! पती, सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी केलं जेरबंद

अहिल्यानगर :  जातेगाव शिवारातील हॉटेलवर छापा टाकून अनैतिक व्यवसाय प्रकरणी चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असताना, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक हमीद शेख यांना कारवाईचे आदेश दिले.

 त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतल्यानंतर हॉटेल जयराज येथे छापा टाकला. या कारवाईत कलंदर सत्तारअली शेख (रा. वडू रोड, कोरेगाव भिमा, ता. शिरूर, जि. पुणे) व हनुमंत अशोक देटके (रा. नागटापी, सासपडी, ता. जि. सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले.

 हॉटेलमधील खोल्यांची झडती घेतली असता चार महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली असून आरोपी व पीडित महिलांना सुपा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमीद शेख व त्यांच्या पथकाने केली.

COMMENTS