Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झगडेफाटा–तालुका हद्द रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणार;आ. आशुतोष काळे ; शहा-पोहेगाव येथे ३३ केव्ही वाहिनी व विकासकामांचे लोकार्पण

कोपरगाव : मतदारसंघात रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत. झगडेफाटा ते तालुका हद्द (भागवतवाडी)

रोहमारे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा : आ.आशुतोष काळे
‘शरदचंद्रजी पवार’ पतसंस्थेस सव्वादोन कोटींचा नफा

कोपरगाव : मतदारसंघात रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत. झगडेफाटा ते तालुका हद्द (भागवतवाडी) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपयांचा निधी मिळविला असला तरी तो रस्ता सिमेंट काँक्रीटचा होईपर्यंत समाधान होणार नाही, असे स्पष्ट करत हा रस्ता पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

पोहेगाव येथे शहा सबस्टेशन ते पोहेगाव सबस्टेशन या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचे लोकार्पण तसेच श्री मयुरेश्वर देवस्थान परिसर विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आ. काळे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गासह जिल्हा व गावांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाली आहेत. एनएच-७५२ जी या मार्गावर मालेगाव ते कोपरगाव दरम्यान सावळीविहीर–कोपरगावसारखा सिमेंट काँक्रीट रस्ता इतरत्र नसल्याची खंत व्यक्त करत, देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच धर्तीवर झगडेफाटा ते तालुका हद्दपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोहेगाव परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी २.६० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीमुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम झाला आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोळपेवाडी येथे मंजूर झालेले सबस्टेशन पुढे शहा येथे हलविण्यात आले. तरीही कोळपेवाडी व चासनळी उपकेंद्रांना शहा सबस्टेशनला जोडून घेण्यात आले असून आता पोहेगाव उपकेंद्रही जोडले गेल्याने परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला.

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना पाणी मिळावे व धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत, उजनी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू केल्याने टप्पा-१ मधील गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तसेच टप्पा-२ मधील गावांना निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने अकरा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोळपेवाडीचे सबस्टेशन विरोधकांनी शहा येथे हलवले

जे सबस्टेशन शहाला झाले ते सबस्टेशन कोळपेवाडीला होणार होते. त्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने जवळपास सात एकर जागा एमएसबीला दिली होती. त्यामुळे कोपरगाव तालुक्याचा विजेचा प्रश्न पण सुटला असता आणि सभासद शेतकऱ्यांना ऊस दरात थोडे पैसे जास्त पण मिळाले असते. परंतु  कोळपेवाडी येथे होणारे सबस्टेशन शहा येथे हलविण्यात आल्याने तालुक्याच्या विकासाला धक्का बसल्याचा आरोप करत, त्या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचे आ. काळे यांनी नमूद करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

COMMENTS