दिल्लीत आणि अमृतसरमध्ये आढळली स्फोटके

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्लीत आणि अमृतसरमध्ये आढळली स्फोटके

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह विविध शहरात ड्रोन हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर, प्रजासत्ताक दिनापूर्वी देशाची राजधानी

दि फ्रेंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’
मुंबईत लवकरत ब्लास्ट करणार, मुंबई पोलिसांना ट्वीटरवरुन धमकी
शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंड मध्ये फसवणूक

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह विविध शहरात ड्रोन हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर, प्रजासत्ताक दिनापूर्वी देशाची राजधानी दिल्ली येथे स्फोटके सापडलीत. शहरातील गाझीपूर परिसरातील फ्लॉवर मार्केटमध्ये सापडलेल्या बेवारस बॅग आढळून आलीत. बॉम्ब स्कॉडने भाजीमंडी जवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून ही स्फोटके निकामी केली. तर दुसरीकडे पंजाबमधील अमृतसरमध्ये आरडीएक्स आढळून आल्यामुळे खळबळ उडाली.
दिल्लीतील स्फोटकांविषयी अधिक माहिती देतांना दिल्लीचे पोलिस म्हणाले की, एका बॅगमध्ये साधारण तीन किलो वजनाचा आयईडी बॉम्ब ठेवला होता अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलीय. वेळीच हा बॉम्ब डिफ्यूज करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. इथे हा बॉम्ब कुणी ठेवला? याचा पोलीस तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयईडी बॉम्ब प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मार्केटमध्ये सापडेला बॉम्ब असचा ठेवला नसून त्याला त्याला टायमरही लावण्यात आला होता, त्यामुळे जास्त धोका होता. पोलिसांनी प्राथमिक पाहणी केल्यानंतर बॉम्ब नाशक पथक इथे बोलवण्यात आले, तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. पिशवी टाकून एक माणूस सकाळी 9.30 च्या सुमारास स्कूटीवरून बाजारात गेला, काही वेळाने ही पिशवी तिथेच घटनास्थळी पडलेली दिसली, त्यानंतर फूल विक्रेत्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने पोलिसांना बोलावले. आता कट उधळल्याने मोठा अनर्थ टळला आहे, मात्र दिल्ली पुन्हा टार्गेटवर आली आहे का? या कटामागे कुठल्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहे. पोलिसांच्या तपासात पुढे काय महिती समोर येतेय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दल, बॉम्बशोधक पथक आणि एनएसजीला माहिती दिली. यानंतर बॉम्बशोधक पथकाने हा आयईडी भाजी मंडईच्या आतील मोकळ्या मैदानात 8 फूट खोल खड्ड्यात पुरला. यावेळी स्फोटाचा आवाजही ऐकू आला, मात्र जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. एनएसजीच्या पथकाने ज्या ठिकाणी ही कारवाई केली त्या ठिकाणची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली होती.

अमृतसरमध्ये आरडीएक्स सापडले
दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील अमृतसरमध्ये 4-5 किलो आरडीएक्स सापडले आहे. यानंतर स्पेशल टास्क फोर्सने परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील गुरुदासपूरमध्येही आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्येच लुधियाना येथील न्यायालय संकुलात स्फोट झाल्याची घटना घडली होती. पंजाबमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आरडीएक्स सापडल्याने भीती पसरली आहे.

COMMENTS