Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशासाठी सासरी छळ, चौंघाविरूद्ध गुन्हा

 शेवगाव : तालुक्यातील वरूर बु. येथे विवाहित महिलेला सासरी पैशासाठी छळ व मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात च

‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
एमएसईबी सबस्टेशनवरील जबरी चोरी उघड; तिघे जेरबंद, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
लाड जळगावच्या साळशीद्ध बाबा यात्रेत रंगला कुस्त्यांचा थरार

 शेवगाव : तालुक्यातील वरूर बु. येथे विवाहित महिलेला सासरी पैशासाठी छळ व मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चौंघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गदेवोडी (ता. शेवगाव) येथील काकासाहेब भाऊराव मडके (वय ७०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी सीमा काकासाहेब मडके हिचा विवाह वरूर बु. येथील अशोक लक्ष्मण वावरे याच्याशी झाला होता. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर पती व सासरच्यांकडून सीमा हिच्याकडे रुपये  सात लाख इतक्या रकमेची मागणी करण्यात येऊ लागली. ही रक्कम आणून देण्यास नकार दिल्यामुळे “स्वयंपाक करत नाही” तसेच “लग्नात अपेक्षित मानपान मिळाला नाही” या कारणांवरून तिला शिवीगाळ करून वारंवार मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोक लक्ष्मण वावरे (पती), लक्ष्मण अंबादास वावरे (सासरे), राजू लक्ष्मण वावरे (दीर), (सर्व रा. वरूर बु., ता. शेवगाव), संजय मोहन काकडे, (रा. आव्हाने ब्रु)  आदी  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे: पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर करत आहेत.

COMMENTS