Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. संग्राम पाटील यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : भारतीय वंशाचे ब्रिटनमधील नागरिक आणि प्रसिद्ध चित्रफीत निर्माते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त

गायकवाडचे बोल म्हणजे सत्तेतून आलेला माज !
आ. गायकवाड यांची प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी;‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या शीर्षकावरून घातला वाद
अर्वाच्य भाषा वापरून लोकशाहीचा गळचेपी हीच संस्कृती का?-माकप; आ.संजय गायकवाड, बागेश्वर बाबा प्रकरणी  कारवाईची मागणी-कॉ.अजय बुरांडे
डॉ. संग्राम पाटील यांना भारतातून परत जाऊ देण्यास मुंबई पोलिसांचा विरोध;  उच्च न्यायालयात कोणती भूमिका मांडली? - Marathi News | Mumbai Police Stopped  Uk Doctor And ...

मुंबई : भारतीय वंशाचे ब्रिटनमधील नागरिक आणि प्रसिद्ध चित्रफीत निर्माते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या ‘लुकआउट सर्क्युलर’मध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, त्यामुळे त्यांच्या ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपच्या एका पदाधिकार्‍याने डॉ. पाटील यांच्या सामाजिक माध्यमावरील लिखाणावर आक्षेप घेत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत संबंधित नेत्याबद्दल अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मानहानीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्या परदेश प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत ‘लुकआउट सर्क्युलर’मध्ये तातडीने बदल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशांनुसार, डॉ. संग्राम पाटील यांना येत्या काही दिवसांत ब्रिटनला परतण्याची परवानगी मिळणार आहे. दरम्यान, तपास प्रक्रियेदरम्यान आवश्यकतेनुसार हजर राहण्याचे आणि पूर्ण सहकार्य करण्याचे लेखी आश्‍वासन डॉ. पाटील यांनी दिले आहे. हे हमीपत्र राज्य सरकारने स्वीकारले असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS