Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण आखाडे ओबीसीची वज्रमुठ आवळतील-आ.धनंजय मुंडे

पवार साहेबांनी न्याय दिला-आ.सोळंके, संघर्षाला संधी आता सोने करा-अमरसिंह पंडित, काकामुळे ओबीसीचा विश्वास मिळवू-आ.क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - राष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी सेल चे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांचा भव्य सत्कार काल मायभूमीने केला . राष्ट्रवादीच्या सदरेवर मान

भुजबळानंतर आता धनंजय मुंडेना धमकी
बीड जिल्ह्याचे शिष्टमंडळ कृषीमंत्री ना.धनंजय मुंडेच्या भेटीला
राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत

बीड प्रतिनिधी – राष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी सेल चे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांचा भव्य सत्कार काल मायभूमीने केला . राष्ट्रवादीच्या सदरेवर मानाचे पद मिळाला म्हणून जिल्ह्यातील 60 ओबीसी समुदायाच्या प्रमुखांनी एकत्रित येऊन प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांचा भव्य सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारकर्ते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आता ओबीसी आणि राष्ट्रवादी हे नाते अधिक मजबूत होईल आणि या निमित्ताने कल्याणराव आखाडे यांची निवड सिद्ध व साध्य होईल असे म्हटले . आपण व कल्याणराव गेली 17 वर्षे एकमेकांचे सहकारी राहिलो असून आपण व काकांचा संघर्ष सारखा असल्याचे म्हटले . यशवंतराव नाट्यगृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात नियुक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला . यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत आ संदीप क्षीरसागर , आ प्रकाश सोळंके , माजी आ अमरसिंह पंडित , आ . बाळासाहेब आजबे , युवक चे प्रदेश अध्यक्ष शेख महेबूब , जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण . मयूर वैद्य प्रदेश अध्यक्ष सावता परिषद , रामकृष्ण बांगर , सतीश शिंदे , नारायण बाप्पा शिंदे सह मान्यवर उपस्थित होते .  

       सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.कल्याण काका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने भव्य सत्कार समारंभास जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते . मागील सतरा वर्षांपासून सावता परिषदेचे काम करत कल्याण काकांनी महाराष्ट्रामध्ये मोठे संघटन उभे केले.सर्वसामान्य कार्यकर्त्याला एखादी संघटना सक्षम करत असताना अनेक दिव्य पार करावे लागतात.एका सामान्य कार्यकर्त्याने महाराष्ट्राभर ती संघटना टिकवण्यासाठी, संघटना वाढविण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची जाणीव असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.केवळ जिद्द, मेहनत,चिकाटी आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर कल्याण काकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सावता परिषद उभी केली आणि आज हे पद मिळवले . शरद पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी एकमत करून राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष पद अतिशय जाणीवपूर्वक कल्याण काकांना दिले असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. पवार साहेब मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात पवार साहेबांनी पहिल्यांदा केली हे ना धनंजय मुंडे यांनी म्हटले .काकांवर टाकलेल्या या जबाबदारीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील हे नेतृत्व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचून ओबीसी समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला . प्रकाश सोळंके यांनी कल्याण काकांना संधी देऊन पवार साहेबांनी बीडचा बहुमान वाढवला असल्याचे म्हटले तर माजी आ. अमरसिंह पंडित यांनी कल्याण आखाडे या नावाचा संघर्ष मी जवळून पाहितल्याचे म्हटले , आता संधी मिळाली त्या संधीचे सोने करा व कराल अशी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त केला . कार्यक्रमाचे प्रस्ताविक सावता परिषद जिल्हा अध्यक्ष किशोर राऊत यांनी तर आभार प्रदर्शन ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष रुक्मानंद खेत्रे यांनी व्यक्त केले . ज्या समुदायांची नोंद अनेकदा राजकीय पटलावर होत नाही मात्र कल्याण आखाडे यांच्या लोकसत्काराला कंकया , वासुदेव , गोंधळी , गुजर लोणार आतार कोष्टी भोई साळी सुतार कैकाडी बकर कसाब मोमीन शिकलकर , खाटिक , मनियार , दसनाम , पद्मशाली , गारुडी , पात्रुड , सह 60 असे समुदायाचे प्रतिनिधी एकत्रित आले जे जिल्ह्याने पहिल्यांदा अनुभवले असेल . कल्याण आखाडे यांचा पहिलाच सत्कार ओबीसीच्या एकीला निमित्त आणि कारणी लागला . आजवर बहुसंख्याक समुदायाची भीती दाखवून ओबीसीची मते पदरात पाडून घेतली मात्र त्यांच्या विकासाची मात्र जबाबदारी घेतली नाही . केवळ मतदाना पुरते ओबीसी वापरले मात्र यातून सामाजिक असुरक्षेची खोटी भीती दाखवून ओबीसीची दिशाभूल बीड विधानसभेत व महाराष्ट्रात झालेली आहे . राष्ट्रवादी हाच एक असा पक्ष आहे ज्यांचे संस्थापक पवार साहेब पुरोगामी विचार घेऊन काम करत आहेत असे आ संदीप क्षीरसागर यांनी म्हटले .

COMMENTS