Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्वाच्य भाषा वापरून लोकशाहीचा गळचेपी हीच संस्कृती का?-माकप; आ.संजय गायकवाड, बागेश्वर बाबा प्रकरणी  कारवाईची मागणी-कॉ.अजय बुरांडे

बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणार्‍या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेने

आ.संजय गायकवाडांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही; शिवसेनेने हात झटकले, विधानाचा केला निषेध
आ.संजय गायकवाडांवर खा.छत्रपती शाहू महाराजांचा संताप
गायकवाडचे बोल म्हणजे सत्तेतून आलेला माज !
Kisan Sabha News I Beed News I Morcha I सरकार उद्योगपतींना कडेवर घेऊन  शेतकऱ्यांना गाडू पाहतेय : कॉम्रेड अजय बुरांडे I Saam TV News I

बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणार्‍या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे  संपादक प्रशांत अंबी यांना अत्यंत वाईटरित्या शिवीगाळ करत धमक्या दिल्या.  माता भगिनी वरून त्यांनी वापरलेली भाषा कोणत्याही सभ्य माणसाला सहन होणार नाही अशी आहे. आमदार संजय गायकवाड यांचा व त्यांच्या पक्षाचा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा आहे.लोकशाही मध्ये व्यक्त होणार्‍या व्यक्तीला अशा पद्धतीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणे, हीच आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आणि संस्कृती आहे का असा प्रश्न करत सरकारला पाठिंबा देणार्‍या संजय गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीड यांनी केली आहे.
कॉ.गोविंद पानसरे लिखित पुस्तकावरून प्रकाशकाना आ. संजय गायकवाड यांनी खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या कथित संभाषणात स्त्री जातीबद्दल अवमानकारक शब्द प्रयोग करण्यात आले.एकीकडे नारी वंदनाची भाषा करायची व दुसरीकडे महिलांबद्दल अर्वाच्य भाषा वापरणार्‍यांचा पाठिंबा घेत त्यांच्या कृतीचे, मौन बाळगत समर्थन करायचे का? योग्य कारवाई करणार याबाबत भूमिका स्पस्ट करण्याची मागणी केली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये कथा वाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केले या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत समर्थन करत आहेत काय ? असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उपस्थित केला असून याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीड जिल्हासचिव कॉ.ऑड.अजय बुरांडे यांनी केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय गायकवाड व कथावाचक बागेश्वर बाबा या दोघांवरही कडक कारवाई करावी अशी मागणी ही वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS