Homeताज्या बातम्याअहमदनगर

शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेवगाव :  शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतूक तसेच गोमांस विक्रीप्रकरणी दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या असून, या कारवायांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना १४ मे रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली की, मळेगाव शिवारातील ढोरा नदी परिसरातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ तपास पथकासह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व चालक भागवत लक्ष्मण गर्जे (वय ४२, रा. मळेगाव, ता. शेवगाव) यास ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, डम्पिंग ट्रॉली व एक ब्रास शासकीय वाळू असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ संदीप आव्हाड करीत आहेत.दरम्यान, १५ मे रोजी सकाळी सम्राट अशोकनगर परिसरात एका घरामागे गोवंश जनावरांचे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोहंम्मद कैफ फय्याज सौदागर (वय २४, रा. सम्राट अशोकनगर, शेवगाव) याच्या घरावर छापा टाकला. छाप्यात घराच्या मागील बाजूस गोवंश जनावरांचे अवशेष तसेच मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करून सुमारे २०० किलो गोमांस, धारदार सुऱ्या व तराजू असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. केमिकल तपासणीसाठी गोमांसाचा नमुना सीलबंद करून ठेवण्यात आला असून उर्वरित गोमांस पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह शेवगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई  
शेवगावात अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा१७० किलो साठा जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 

COMMENTS