बीड: शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई प

बीड: शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन बीड शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात बीड शहरातील प्रमुख ठिकाणी महिलांसाठी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे, महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची व्यासपीठ मिळण्यासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, करचुंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची श्रेणीवाढ करणे, नवीन आरोग्य उपकेंद्राला मंजुरी देणे तसेच खटकाळी तलाव व कपिलधारवाडी येथील प्रकल्पबाधित कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.
या मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक निर्णय झाल्यास बीड क्षेत्रातील महिला, शेतकरी, पशुपालक व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास डॉ. ज्योतीताई मेटे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसंग्रामचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS