Homeताज्या बातम्या

जम्मू-श्रीनगर महामार्गावर हाय अलर्टपोलिसांच्या गोळीबारानंतरही संशयित वाहन थांबले नाही ; शोधमोहीम सुरू

उधमपूर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रकोट येथील सुरक्षा तपासणी नाका तोडून भरधाव वेगाने निघालेल्या एका संशयित चारचाकीमुळे सुरक्षा यं

काश्मीरमध्ये भीषण अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; १७ जण ठार, ३१ जखमी
काश्मीरमध्ये भीषण अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; १७ जण ठार, ३१ जखमी
उधमपूरमध्ये बस अपघातात 21 जणांचा मृत्यू
ऑपरेशन सिंदूर की वर्षगांठ पर हाई अलर्ट, जम्मू-श्रीनगर हाईवे पर सुरक्षा कड़ी  - jammusrinagar highway on high alert for operation sindoor anniversary


उधमपूर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रकोट येथील सुरक्षा तपासणी नाका तोडून भरधाव वेगाने निघालेल्या एका संशयित चारचाकीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. वाहन थांबविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता तेथून पलायन केले. काही वेळानंतर हे वाहन निर्जन भागात सोडून दिलेल्या अवस्थेत आढळले असून चालकाचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. काळ्या रंगाचे हे वाहन श्रीनगरहून जम्मूकडे जात होते. रामबन जिल्ह्यातील चंद्रकोट सुरक्षा चौकीवर तैनात पोलिसांनी नियमित तपासणीसाठी वाहनाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने वेग कमी न करता थेट तपासणी नाका ओलांडत अडथळे मोडून पुढे धाव घेतली. संशयास्पद हालचाली लक्षात येताच पोलिसांनी तातडीने वाहनाचा पाठलाग सुरू केला. वाहनाचे टायर निकामी करून ते थांबविण्याच्या उद्देशाने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. तरीही चालकाने वाहनाचा वेग कायम ठेवत नाशरीच्या दिशेने पलायन केले. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने दलवास परिसरात रस्त्याच्या कडेला वाहन सोडून दिले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तो जंगलाच्या दिशेने पसार झाला. सुरक्षा दलांनी तातडीने वाहन ताब्यात घेतले असून त्याची सखोल तपासणी करण्यात येत आहे. घटनेनंतर रामबन जिल्हा पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारतीय लष्कराने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली आहे. चंद्रकोट, नाशरी, दलवास तसेच आसपासच्या जंगल परिसरात संशयिताचा शोध घेतला जात आहे. शोधमोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी मानवरहित उड्डाण यंत्र आणि श्‍वानपथकाची मदत घेण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

COMMENTS