Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

काश्मीरमध्ये भीषण अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; १७ जण ठार, ३१ जखमी

https://www.youtube.com/watch?v=fJwhGI6zXuw जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर आली आहे. रामनगरच्या डों

यमुना एक्सप्रेसवर अपघातात चौघांचा मृत्यू
इंदौरमध्ये गॅस पाइपलाइन लीक झाल्याने भीषण स्फोट; अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण घर कोसळले
राजधानीत 9 जणांचा होरपळून मृत्यू; चार मजली इमारतीला आग लागून दुर्घटना

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर आली आहे. रामनगरच्या डोंगराळ भागात प्रवाशांनी खच्चून भरलेली एक बस पलटी झाली असून, या भीषण अपघातात १७ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ही बस रामनगरहून उधमपूरकडे निघाली होती. सकाळी १० च्या सुमारास डोंगराळ वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट पलटी झाली. शांत असलेल्या परिसरात अचानक प्रवाशांच्या किंकाळ्या आणि रडारड सुरू झाली. स्थानिक लोक आणि आपत्कालीन विभागाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं, पण दुर्दैवाने १७ जणांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेत ३१ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
या भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण उधमपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, डोंगराळ भागातील बस प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

COMMENTS