Homeताज्या बातम्या

परळीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (खढख) निर्लेखित साहित्याचीनिविदा पद्धतीने विक्री; 14 ऑगस्टपर्यंत मुदत

बीड : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खढख), परळी वैजनाथ, जि. बीड या संस्थेतील निर्लेखित फर्निचर, हत्यारे व उपकरणे, लहान यंत्रे, संयंत्रे व स्क्रॅप इत्

कृषी दिनानिमित्त सेलू येथे अश्ववगंधा लागवड व नोंदणी मोहिमेस प्रारंभ
सोयीचे राजकारण
ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शिखांची निदर्शने
ग्रामीण आय टी आय दगडवाडी ता परळी जि बीड. | Parli Vaijnath


बीड : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खढख), परळी वैजनाथ, जि. बीड या संस्थेतील निर्लेखित फर्निचर, हत्यारे व उपकरणे, लहान यंत्रे, संयंत्रे व स्क्रॅप इत्यादी साहित्याची विक्री निविदा पद्धतीने करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी सदर निविदा शुक्रवार, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत भरून सादर करावयाच्या आहेत. विक्रीकरिता ठेवलेले साहित्य पाहण्यासाठी याच दिवशी (14 ऑगस्ट) सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. खरेदीस इच्छुक असणार्‍या व्यक्तींनी किंवा संस्थांनी अधिक माहितीसाठी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परळी वैजनाथ, जि. बीड यांच्याशी संपर्क साधावा. निविदेच्या अटी व शर्ती बाबतची सविस्तर माहिती संस्थेच्या भांडार विभागात कार्यालयीन वेळेत पाहता येईल, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS